बीड दि.२७(प्रतिनिधी):शहरातील(Beed) कालिका नगर परिसरात पायी चालत जात असताना महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.२६) रोजी रात्री ०८:३० च्या सुमारास घडली असून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात शिवाजीनगर (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात चोरीच्या घटनेत मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत असून बीड शहरातील सुनिता मनोहर वनवे (वय ५०) रा.भगवान सदन,कालिका नगर रोड बीड ह्या पायी चालत असताना समोरून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या (Crime)गाळ्यातील १५ ग्रॅमचे गंठण लंपास केल्याची घटना रविवार (दि.२६) रोजी रात्री ०८:३० च्या सुमारास घडली असून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
