बीड दि.७ (प्रतिनिधी)ः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग, गट, गण आरक्षण करताना ही पहिली निवडणुक समजून आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. या संदर्भातील आक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. मात्र मध्यप्रदेशाशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या फेरबदलामुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या आरक्षण पद्धतीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. आता मात्र महाराष्ट्रातील आरक्षण प्रक्रिया पूर्वी ठरल्याप्रमाणेच म्हणजे ही पहिली निवडणुक समजूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढताना आता मागील आरक्षणाचा विचार केला जाणार नाही, प्रत्येक प्रभाग किंवा गट, गण नवीन आहे असे समजूनच आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
बातमी शेअर करा