मुंबई दि.3 - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या तीन महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.
धनंजय मुंडे मला माझ्या मुलांशी भेटू देत नाहीत. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावून मला हकलून लावलं, असं करूणा शर्मा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान मला पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रूवारीपासून मी आमरण उपोषण करेन, असा इशारा देखील करूणा शर्मा यांनी दिला आहे.
बातमी शेअर करा