गेवराई दि.७ (प्रतिनिधी) शहरातील एका मजुराने धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करा या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि.७) रोजी पहाटे संतोष नगर मोंढा नाका भागात घडली.
शहरातील संतोष नगर मोंढा नाका भागातील ज्ञानदेव नामदेव कोल्हे (वय ४४) यांनी मंगळवार (दि.७) रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. कोल्हे यांच्या खिश्यामध्ये चिड्डी आढळून आली आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरू असूनही सरकार दखल घेत नसल्याने संतप्त धनगर समाज बांधव व नातेवाईकांनी मृतदेह गेवराई तहसील कार्यालयासमोर आणून ठेवत ठिय्या आंदोलन केले.तहसीलदारांनी निवेदन स्विकारल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.कोल्हे कुटूंबियांना सरकारने तात्काळ मदत करावी नसता आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील धनगर समाजबांधवांनी दिला.

बातमी शेअर करा