शिरूरकासार दि.५ (प्रतिनिधी):तालुक्यातील (Shirur kasar)रायमोहा येथे शिरूर-पाथर्डी रोडवर झालेल्या (Accident)अपघातात कपिलधार ते मानूर पायी दिंडीतील पाच भाविकांना रविवार (दि.५)रोजी पिकअपने उडवले यात एका महिला भाविकाचा मृत्यु झाला तर चार महिला जखमी झाल्या आहेत.
कपिलधार ते मानूर पायी दिंडी सोहळा जात होता यात ५० ते ६० भाविक पायी चालत होते.शिरूर कासार (Shirur kasar) तालुक्यातील रायमोहा येथे आज रविवार (दि.५) रोजी पहाटे ०४ ते ०५ च्या सुमारास पायी चालत असलेल्या पाच महिला भाविकांना शिरूर कडून येत असलेल्या पिकअप क्रमांक एमएच १२ सिटी ८५८८ चालक मिनीनाथ बबन खताळ (वय ४२) रा.मानूर टाकळी ता.पाथर्डी जि.आहिल्यानगर याने उडवले.यात राजश्री (सिंधू) संतोष घेवारे (वय ४२) या महिलेचा जागीच मृत्यु झाला असून अरुणा उमेश कळमकर (वय ३६) रा. शनिवार पेठ,बीड, रुक्मीणी अमरनाथ कळमकर (वय ४४) रा.शनिमंदिर गल्ली पेठ,बीड,सुमन सिद्धेश्वर चिपाडे (वय ३९) रा.हिवरसिंगा ता.शिरूर कासार.जि.बीड,वैष्णवी पशुपती भुरे (वय १६) रा.कालिका नगर बीड या चार जखमी महिलांना ग्रामीण रुगालय रायमोहा येथे उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी (Beed)बीड येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची(Police) माहिती मिळताच सपोनि .श्री.तागड व रायमोह पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार रवी उबाळे,भागवत खूपसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.