बीड- तालुक्यातील नेकनूर येथून जवळ असलेल्या रत्नागिरी या गावांमध्ये धनराज मोतीराम सपकाळ (वय-६)राहणार रत्नागिरी ता. जि.बीड हा विद्यार्थी स्वतःच्या बहिणी सोबत बुधवारी (दि.3) सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान शाळेत गेला होता त्याचा सकाळी ११:०० च्या दरम्यान मृतदेह शाळेच्या आवारातच आढळून आला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून
मृतदेह नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या गळ्याभोवती हाताने आवळण्याच्या खुणा आहेत. यावरून हा खुन असावा असा अंदाज असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदानासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान याचा अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण समोर येणार असून नेकनूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा