Advertisement

तलवाड्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात

प्रजापत्र | Tuesday, 30/09/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.३० (प्रतिनिधी):गेवराई-माजलगाव रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज मंगळवार (दि.३०) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास तलवाड्याजवळ घडली.

   गेवराई तालुक्यातील तलवाड्यापासून काही अंतरावर असलेल्या गेवराई-माजलगाव रोडवरील राजुरी मळा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बाळू आत्माराम शिंदे (वय ३५) रा. राजुरी मळा याचा जागीच मृत्यु झाला तर दुसरादुचाकींचीचीस्वार नवनाथ राठोड (वय ३५) रा.देवितांडा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गेवराई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचाही मृत्यु डॉक्टरांनी घोषित केले . सदरील अपघाताची माहिती मिळताच तलवाडा ठाण्याचे सपोनि मनोज निलंगेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

Advertisement