पाटोदा : तालुक्यातील नायगाव शिवारात वळणावर कार व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) रात्री उशिरा घडली.
आशिष चंद्रकांत राख (वय २४, रा. थेरला, ता. पाटोदा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. आशिष राख आपल्या मित्रांसह कारमधून पाटोदाकडे जात असताना पाटोदा आगाराची बस बीडकडे येतं असताना वळणावर हा अपघात झाला.या अपघातात संघर्ष बांगर वय (वय-२५) आणि विजय सानप (वय-२५) या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
बातमी शेअर करा