Advertisement

 ऑगस्ट मधील अतिवृष्टी नुकसानीची मदत जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 23/09/2025
बातमी शेअर करा

मुंबई: मुंबई -राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी नाले धरण ओसंडून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ची दोन हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात एक लाख १४ हजार शेतकऱ्यांना ५६ कोटी ७४ लाख रुपये मदत मिळणार आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना झाला आहे. आतापर्यंत १८२९ कोटी रुपयांची निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. उर्वरित निधी ८ ते १० दिवसांत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोणत्या विभागाला किती निधी?

सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार, अमरावती विभागातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्ना ५६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूर विभागातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांना २३ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. पुणे विभागात सर्वात कमी नुकसान झाले आहे. विभागातील केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांना सुमारे १४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल १० लाख ३५ हजार शेतकरी बाधित असून त्यांना ७२१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यात ३ लाख ८० हजार एवढे आहेत. त्याचप्रमाणे हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे. नाशिक विभागातील १७ हजार ३३२ कोटी शेतकऱ्यांना ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

 

हिंगोली

आॅगस्ट महिन्यात बाधित झालेली शेतकऱ्यांना मदत

३.०४ लाख बाधित शेतकऱ्यांची संख्या

बाधित क्षेत्र - हेक्टर २.७१ लाख

हिंगोलीमध्येच बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २३१.१८ कोटी रुपयांची मदत

 

बीड

आॅगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत

बाधित शेतकऱ्यांची संख्या - १.१४ लाख

५६.७४ कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर

 

धाराशिव

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात

झालेल्या नुकसानीचा मदत जाहीर

धाराशिव जिल्ह्यात बाधित झालेल्या

शेतकऱ्यांची संख्या २.३४ लाख

याबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

१८९.६१ कोटी रुपयांची मदत

 

लातूर

आॅगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर

बाधित शेतकऱ्यांची संख्या - ३.८० लाख

मदत जाहीर - २.३५ कोटी रुपये

 

नाशिक

नाशिकात ऑगस्ट महिन्यात झालेल्या

बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार १०८

या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

३.८२ कोटी रुपयांची मदत मंजूर

 

धुळे

धुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात

बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ७२

या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

२ लाख रुपयांची मदत

 

नंदुरबार

नंदूरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात

बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५

याबाबीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी

१ लाख रुपयांची मदत

जळगाव

जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित

झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजार ३३२

या जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

९.८६ कोटी रुपयांची मदत

अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यात बाधित

झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १४०

या शेतकऱ्यांसाठी सरकारच्यावतीने फक्त

६ लाख रुपयांची मदत जाहीर

Advertisement

Advertisement