अंबाजोगाई दि.२१ (प्रतिनिधी):शहरातील बोरुळ तलावात एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह रविवार (दि.२१) रोजी सकाळी तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तलाव परिसरात पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. मात्र, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने कोणाचा आहे ? हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.या घटनेमुळे बोरुळ तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अंबाजोगाई शहर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून तपास गतीमान केला आहे.
बातमी शेअर करा