बीड दि.१६ (प्रतिनिधी)-कुटे ग्रुपच्या संचालक अर्चना कुटे यांना पुण्यातून सीआयडीच्या टीमने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.ज्ञानराधातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या.अखेर पुण्यातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला होता.यामुळे अनेक ठेवीदारांनी आपले प्राण ही सोडले.सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा