बीड दि.१५ (प्रतिनिधी): अहिल्यानगर तालुका शेवगाव मु. पो. ढाकणे वस्ती पैठण पंढरपूर महामार्ग हातगाव मधील रहिवासी असणाऱ्या कुशल शेतकरी असणाऱ्या पार्वती बाई विश्वनाथ ढाकणे यांचे १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वर्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले होते. यामुळे ढाकणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्र लिहीत ढाकणे कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
एकत्रित कुटुंब पद्धतीत ४० वर्षांपूर्वी हातगाव येथे ढाकणे परिवाराने पैठणच्या उजव्या कालव्या खाली शेती घेतली होती कुशल व प्रगतशील शेतकरी म्हणून त्या परिसरात चांगलं उत्पादन घेत होत्या स्वतः अशिक्षित असून आपल्या एका मुलाला व सुनेला शिक्षण घ्यायला लावून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक म्हणून गरुड झेप घ्यायला लावण्यात या मातेचे योगदान मोठे होते.. बा. मा. पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बिरदवडी चाकण चे व वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांच्या त्या मातोश्री होत्या तर खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या संचालिका व कन्या विद्यालय चाकण च्या उपशिक्षिका आशा दादासाहेब ढाकणे यांच्या त्या सासुबाई होत्या.. ढाकणवाडी चे मा. 3 टर्म सरपंच विश्वनाथ ढाकणे यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात २ मुली २ मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरातून व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून नागरिकातून व नातेवाईकातून श्रद्धांजलीचा वर्षाव व्यक्त करून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर ढाकणे कुटुंबाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी पार्वतीबाई विश्वनाथ ढाकणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याचे समजले, अतीव दुःख झाले. पार्वतीबाई हया कुटुंबवत्सल, मनमिळावू आणि धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या, त्यांच्या निधनाने आपल्या कुटंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना... भावपूर्ण श्रध्दांजली.. अश्या शब्दात सांत्वन केले. या सोबतच अहिल्यानगर भाजपाचे उपाध्यक्ष राहुल कारखिले महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे निमंत्रित सदस्य ॲड. विवेक नाईक, शनिशिंगणापूर वंजारवाडी सोनई येथील श्री दराडे, ग्राम विकास अधिकारी रमेश उंदरे यांनीही दुःख व्यक्त करत ढाकणे कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नोंदविला.