Advertisement

‘ओबीसींचं आरक्षण संपवलं’ म्हणत युवकाने जीवन संपवलं

प्रजापत्र | Friday, 12/09/2025
बातमी शेअर करा

लातूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश काढलायं. या अध्यादेशामुळे आता ओबीसी आरक्षणाचं कसं होणार? या चिंतेतून लातूर  तालुक्यातील वांगदरी गावातील एका ३५ वर्षीय ओबीसी बांधवाने नदीत उडी मारुन जीवनयात्रा संपवलीयं. या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ आणि आ.धनंजय मुंडे यांनी कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केलंय.

       भरत कराड असं या ओबीसी बांधवाचं नाव असून ते रिक्षाचालक होते. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मागील अनेक वर्षांपासून ते ओबीसी बचाव आंदोलनात सक्रिय होते.मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करुन कुणबी म्हणून सामिल करण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात येईल. या निषेधार्थ कराड यांनी हे पाऊल उचलल्याने सांगण्यात येत आहे.ओबीसी बांधवाने आपलं जीवन संपवल्याचं समजताच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी लातूरला धाव घेत कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी कुटुंबियांनी अश्रूंचा बांध फोडला.भरत कराडचं हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आपण पूर्ण ताकदीने लढायचं, पण तुम्ही आत्महत्या करु नका. लोकशाही मार्गाने आपण लढू. राज्यात लोकशाही नाही का? बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाही का? कोर्ट नाही का? रोज वेगवेगळी घोषा करुन दहशत निर्माण करीत आहेत. अठरापगड जातीने आपली एकजूट तोडू नका, असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय.दरम्यान, आम्ही आज का आलो हे सांगायला नको. आमचा भरत कराड प्रत्येक ओबीसी लढ्यात हजर रहायचा. एक ध्यास त्याने घेतला होता. आमचं ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये. आज कित्येक भरत कराड सारखे आपल्या प्राणाचे बलिदान देत आरक्षणासाठी लढत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं.

Advertisement

Advertisement