अंबाजोगाईत दि.११ (प्रतिनिधी): शहरातील क्रांतीनगर भागात कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.१०) रोजी घडली.
कैलास सरवदे (वय 37, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मृत पतीचे नाव आहे. बुधवार (दि.१०) सप्टेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर पती-पत्नीत वाद झाला. पत्नी मायाने रागाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कैलास बेशुद्ध पडलेला दिसला.नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पुढील तपास पो.उपनि रविकुमार पवार करत आहेत.