Advertisement

सलून व्यावसायिकावर हल्ला

प्रजापत्र | Friday, 29/08/2025
बातमी शेअर करा

 परळी दि.२९(प्रतिनिधी): वडसावित्री नगर (Crime)परिसरात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका सलून व्यावसायिकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सलून व्यावसायिक योगेश सतिश गवळी (वय ३१) वडसावित्री नगर, परळी वै. हे  बुधवार (दि.२७) रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपी पवन मोरे, सोमनाथ मोरे आणि पवन मोरे यांची आई (नाव माहिती नाही, सर्व रा. वडसावित्री नगर, परळी वै.) यांनी संगनमत करून हल्ला केला.वाद वाढताच पवन व सोमनाथ मोरे यांनी लाकडी दांडा व विटाने गवळी यांच्या मानेवर व पायावर मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी पवन मोरेच्या आईने योगेशच्या आईचे केस पकडून बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement