परळी दि.२१ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Parli)जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथे कौटुंबिक वादातून भीमराव शिवाजी राठोड (वय २६) या (Crime)तरुणाची कोयत्याने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार (दि.२१)रोजी उघडकीस आली.
सविस्तर माहिती कशी कि,मयत भीमराव राठोड व आरोपी अनिल चव्हाण यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातूनच अनिलने भीमरावचा खून करण्याचा कट रचला. गुरुवार (दि.२१) रोजी त्याने भीमरावला रत्ननगर तांड्यावर(Crime) बोलावून पुन्हा बाचाबाची करत अनिलने कोयत्याने भीमरावच्या डोक्यात वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी(Police) पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

