Advertisement

ट्रॅक्टर दरीत कोसळून दोघींचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 18/08/2025
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर: पिनाकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन (Accident) परतताना ट्रॅक्टर दरीत कोसळून झालेल्या अपघातात २ महिला भाविकांचा मृत्यु झाला. तर तब्बल २४ भाविक जखमी झाले आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली.

 

कांताबाई नारायण गायके (५० रा. खामगाव ता. कन्नड) कमाबाई जगदाळे (६५ रा. जानेफळ ता. वैजापूर) असं मृत महिला भाविकांची नावं आहेत. तर सोनाली आप्पा राऊत १४ रा. खामगाव या मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. सोनाली राऊत या तरुणीवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी(Accident) एकूण २७ भाविक आप्पा राऊत यांच्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये गेले होते. सर्वांचे दर्शन झाले. त्यानंतर येऊन ते ट्रक्टरमध्ये बसले. दर्शनानंतर घरी परतत असताना ट्रॅक्टर खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातानंतर डोंगराच्या पायथ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, परमेश्वर श्रीखंडे श्रीखंडे यांनी जखमींना बाहेर काढत उपचारासाठी पाठवलं.

    स्वाती पारसनाथ राऊत १९, मनीषा पारसनाथ राऊत ३८, बालीका दिलीप गायके ३०, वर्षा आप्पा राऊत ३२, कल्याणी राजेंद्र कवडे २०, साई विजय कवडे ११,
प्रतिक्षा विजय कवडे १६, आदित्य योगेश कवडे ७, प्रगती सोमनाथ कवडे ११, दिलीप डिगंबर गायके ३, योगेश अशोक कवडे ३३, पंकज गोरखनाथ कवडे ३५, विजय दादा कवडे ४२, पारसनाथ राऊत ४३, माऊ दिलीप गायके १०, चिऊ दिलीप गायके १२, सुवर्णा संदिप गायके ३१, मावडी संदिप गायके ९, चेतन प्रकाश कवडे १०, प्रतिक्षा प्रकाश कवडे १२, माया प्रकाश कवडे ३२,आप्पा सोपान राऊत ३५, श्रावणी आप्पा राऊत ८ (सर्व रा. खामगाव ता.कन्नड) यांच्यावर छत्रपती संभाजीनगर, शिऊर बंगला, बोलठाण या वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Advertisement

Advertisement