मुंबई: राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची हजेरी लागत आहे .कोकणपट्टीसह विदर्भाला पावसाने झोडपले असून पुढील 4 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . विदर्भात आज पावसाचा जोर वाढणार असून 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . कोकणपट्टीसह पुणे सातारा, सोलापूर, नगर व बहुतांश मराठवाड्यात पावसाचे यलो अलर्ट आहेत .आज पासून मुंबई, ठाणे व उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आंध्र प्रदेश ते ओडिशा किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार आहे .दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा तसेच मराठवाड्यात आज पासून तुफान पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे . 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील .मराठवाड्यात 14 व 15 ऑगस्टला पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत .
कोणत्या जिल्ह्याला कुठले अलर्ट ?
13 ऑगस्ट : यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे .
यलो अलर्ट : मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणपट्टीला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे .सातारा कोल्हापूर पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून पुणे व सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी राहणार आहे .अहमदनगर, सोलापूर, बीड ,धाराशिव, लातूर ,परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती ,वर्धा ,नागपूर, गोंदिया
14 ऑगस्ट : वाशिम, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ,गडचिरोली ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड ,बीड,अहिल्यानगर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणपट्टी
15 ऑगस्ट : रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ ,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाही पावसाचा ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : रायगड ,मुंबई, ठाणे,पुणे कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व नागपूर
16 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी तसेच पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा, अकोला, अमरावती आपल्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे .
यलो अलर्ट : मुंबई, पालघर ,ठाणे, नाशिक व नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय .