बीड दि.८(प्रतिनिधी ): ग्रामपंचायत कार्यालया (Beed)अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठीआज शुक्रवार (दि.८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांच्या पगारा राज्य सरकार वेळेवर करत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.राज्य सरकारने त्यांचा पगार नियमित करावा व इतर मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार (दि.८) रोजी (Collector office)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील अनेक कर्मचार्यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. हे आंदोलन कॉ.नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
