बीड, 01 फेब्रुवारी : डोक्यावर लांब केस, चमचमीत साडी परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरचे सतर्कता दाखवल्याने अवघ्या दहा मिनिटात या चोराला पकडण्यात आले ही घटना रविवारी भर दुपारी चारच्या सुमारास बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये घडली.
मोहिनी जाधव असं डॉक्टरचे नाव आहे. त्या जिल्हा रुग्णालयात कर्तव्य आहेत. परंतु, त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात लहान मुलांचा विभाग काकू नाना हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर मोहिनी जाधव यांना चोरट्याने महिलेच्या वेशात पैसे मागितले असता त्यांनी दहा रुपये काढून दिले. परंतु, त्यांनी तात्काळ त्यांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारून पळ काढला.
मोहिनी जाधव यांनी आरडाओरड सुरू केली आणि काही लोकांनी लगेच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बीड शहरांतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महिलांचा वेष परिधान करून चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
घडलेली घटना गंभीर असून या प्रकरणात आम्ही तक्रार दिलेली आहे. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला येत असतात आणि असा प्रकार घडत असेल तर पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत डॉक्टर बालाजी जाधव यांनी व्यक्त केले.
अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, असे प्रकार गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
बातमी शेअर करा