मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी(Ladki bahin) बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरली आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सध्या जुलै २०२५ चा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (३००० रुपये) मिळणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. या दृष्टीने सरकार नियोजन करीत असून रक्षाबंधन निमित्त जुलै-ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात आता ३ हजार रुपये येणार अशी शक्यता आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने ३० जुलै २०२५ रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी २९८४ कोटी रुपये वर्ग केले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जुलैचा १३ वा हप्ता जमा होऊ होऊ शकतो.
गेल्या वर्षीप्रमाणे, यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला (९ ऑगस्ट २०२५) जुलै आणि ऑगस्टचे हमे एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात असाच शुभारंभ झाला होता, तिथे ३००० रूपये जमा करण्यात आले होते. रक्षाबंधन हा भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे. यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजच्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना ३००० रुपये मिळू शकतात. सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता, यंदाही रक्षाबंधनाला ही रकम खात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.