Advertisement

भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीची छेडछाड 

प्रजापत्र | Monday, 14/07/2025
बातमी शेअर करा

 परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी): रस्त्यावरून जात असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       अधिक माहितीनुसार परळी शहरातील भीमनगर भागात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना त्याच ठिकाणी राहणार्‍या अविनाश साळवे नामक व्यक्तीने अल्पवयीन मुलीस रस्यामध्ये थांबवुन मला तुला काहीतरी बोलायचे आहे असे म्हणाला व थोडे समोर गेल्या नंतर तिच्या उजव्या हाताला पकडुन तीची छेड काढुन तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले व शिवीगाळ केली.ही घटना शनिवार (दि.१२) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली असून या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोउपनि शिंगणे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement