राजस्थानमधील झालावाड येथे एका सरकारी शाळेच्या इमारतीचं छत कोसळल्याने ७ मुलांचा मृत्यु झाला आहे तर ९ जण गंभीर जखमी झाले. झालावाडच्या मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोडी सरकारी शाळेतील एका वर्गात मुले बसली होती तेव्हा खोलीचे छत कोसळले आणि त्याखाली ३५ मुले गराड्यात चिरडली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ ढिगारा काढून मुलांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मनोहरथाना रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ५ मुलांचा जागीच मृत्यु झाला, तर २ मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.
बातमी शेअर करा