बीड दि.२४ (प्रतिनिधी):मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यावर निर्बंध आले असले तरी गुटख्याची विक्री मात्र तेजीत सुरु होती.(Beed)शहरात आणि गल्लीबोळात ही टपऱ्यावर गुटखा आरामात मिळत असल्याचे चित्र असताना मध्यरात्री १ च्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील वानगाव शिवारात नेकनूर (Neknoor)पोलिसांनी लाखोंचा गुटखा ताब्यात घेतला आहे. रजनीगंधा,बाबा आणि विमल कंपन्याचा हा गुटखा असल्याची माहिती आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना आयशर टेम्पोतून गुटखा येतं असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री १ च्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक स्विफ्ट कार ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून यात २० लाख ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील (Police)तपास सुरु असून या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.