Advertisement

6 लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्याविरोधात कारवाई

प्रजापत्र | Thursday, 10/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.10(प्रतिनिधी): माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍याला सुमारे 6 लाखाची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीने पकडल्याची माहिती आहे. या संदर्भात अद्यापही एसीबीची कारवाई सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पथक कसून तपास करत आहेत.
माजलगाव नगर पालिकेत वेगवेगळे प्रकार चर्चेत असतांनाच आता नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍याविरूद्ध थेट छत्रपती संभाजीनगर येथून कारवाई झाली आहे. संभाजीनगर एसीबीकडे आलेल्या तक्रारीनुसार गुरूवारी सायंकाळी उशिरा छत्रपती  संभाजीनगर एसीबीच्या पथकाने माजलगावमध्ये ही कारवाई केली. मुख्याधिकार्‍यांना 6 लाखाची लाच घेताना पकडण्यात आले आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ माजली असून यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Advertisement

Advertisement