दिल्ली : देशात नव्या कृषी कायद्यांवरून आंदोलन पेटलेले असतानाच आता सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर केल्या असून यापुढेही कृषी उत्पादनांची सरकारी खरेदी सुरूच राहणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. गहू, धन उत्पादकांना मागच्या काही वर्षात सातत्याने अधिकच लाभ देण्यात येत आहे , गव्हाची खरेदी ६ वर्षात दुपटीने वाढली आहे असेही सीतारामन म्हणाल्या . किमान हमी भाव मिळावा यासाठी देखील आवश्यक यंत्रणा उभारली जाईल असेही अर्थमंत्री म्हणाल्या. देशभर स्वामित्व योजना लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी कर्जासाठीची तरतूद १६ . ५ लाख कोटी इतकी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा