मुंबई : मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या घटनेत ६ जणांचा मृत्यु झाल्याची (Mumbai Local Train Accident) माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढला असून ही घटना दोन लोकलमध्ये दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धडक होऊन घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दरवाजातून लोक प्रवास करत होते. त्यातले ८ लोक एकमेकांना धडकून खाली पडले होते.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपची लोकल आणि डाऊनची लोकल यांची एकमेकांना धडक झाल्यानं खाली पडले. ८ प्रवासी ट्रॅकवर पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, दरवाजात लटकून प्रवास करत होते.लोकलमधून प्रवास करणारे ८ जण पडले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती समजली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सगळे फूटबोर्डवरून प्रवास करत होते. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी दरवाजे बंद होणाऱ्या नव्या लोकलचा समावेश करण्यात येईल.
रेल्वेतून पडून ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या (Mumbai Local Train Accident) घटनेनंतर आता रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून माहिती देण्यात आली की, नव्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येतील. आयसीएफद्वारे सध्याच्या लोकलना दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाड्यांचे दरवाजे आपोआप बंद होतील.
जागा असूनही प्रवाशी ट्रेनच्या दरवाजात उभा राहून प्रवास करतात हे अनेकदा दिसून आलंय. एक ट्रेन कसाराच्या दिशेने जात होती एक सीएसएमटीच्या दिशेने जात होती. दोन्ही ट्रेन किंवा दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांची धडक झाली असावी. दोन्ही ट्रॅकमध्ये दीड ते दोन मीटर असतं. विरुद्ध दिशेने जात असताना प्रवासी लटकले होते, त्याबाहेर त्यांच्या बॅग होत्या यामुळे धडकले असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं.
प्रवाशांनाही विनंती केली जाते की ट्रॅक क्रॉस करू नका, (Mumbai Local Train Accident) दरवाजात उभा राहू नका. इतकंच नाही तर कार्यालयांनाही वेळ बदलण्याची विनंती केलीय. ५ हजार कार्यालयांना विनंती करण्यात आली होती. मात्र त्याला ४० कार्यालयांकडूनच प्रतिसाद दिला गेला. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.