आष्टी दि.२५ (प्रतिनिधी): शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्स (Accident)समोरून दुचाकीवर जात असलेले पती-पत्नी शेजारी जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या चाकाखाली येत महिला चिरडून जागीच ठार झाल्याची घटना (दि.२५) रविवार रोजी सकाळी बीड-आहिल्यानगर (Ashti) रोडवर झाली.
सकाळी १० च्या सुमारास अहिल्यानगरच्या दिशेने दुचाकी क्रमांक एमएच २० बी.डी.५७०१ वरुन पती व पत्नी जात असताना (Ashti) आष्टी शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्स समोर करिष्मा आयास सय्यद ( वय २४ ) या शेजारी जाणार्या मालवाहतूक ट्रक (के.ए.३९. ६५७०) या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या.दुचाकीस्वार आयास सय्यद ( ३० वर्ष करिमनगर रा.मुर्शदपुर ,आष्टी ) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, अशोक तांबे,बब्रुवान वाणी,सतिश मुंडे, गणेश राऊत, गणेश गिते यांनी तात्काळ धाव घेत अपघातात जखमी झालेल्यांना (Accident) उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघातात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेला. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलिस ठाण्यात सुरू आहे.