Advertisement

 वाळूची वाहतुक करताना ट्रॅक्टर पकडला 

प्रजापत्र | Monday, 19/05/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.१९(प्रतिनिधी): तालुकयातील (Georai) राक्षसभुवन जुना रस्ता येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.१८) रविवार रोजी कारवाई करत ५,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चकलांबा पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       गेवराई (Georai)तालुक्यातील राक्षसभुवन जुना रस्ता येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना राजेश बंडू नाटकर (वय २७) रा.राक्षसभुवन ता.गेवराई यांच्यावर चकलांबा पोलिसांनी (दि.१८) रविवार रोजी कारवाई केली यात महिंद्रा ७५७डीआय एक्सपी प्लस कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर अंदाजे किंमत ५,००,००० रुपये, हिरव्या रंगाची ट्रॉली अंदाजे किमत ५०,००० रुपये,ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ३,००० रुपये असा एकूण ५,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून (Georai) चकलांबा पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Advertisement

Advertisement