गेवराई दि.१९(प्रतिनिधी):तालुक्यातील (Georai) केकतपांगरी येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्या,चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दि.१०) शनिवार रोजी घडली असून चोरटयांनी १,०४,४०० रुपयांचा एवज (Crime)लंपास केल्या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
गेवराई तालुक्यातील (Georai) केकतपांगरी येथील बाबासाहेब अक्रूर राऊत (वय ३६) यांच्या घराचे भरदिवसा अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून घरातील सोन्या,चांदीच्या दागिन्यांसह रोक रक्कम लंपास केल्याची घटना (दि.१०) शनिवार रोजी घडली असून यामध्ये १० ग्रॅमची एक सोन्याची चैन,बदाम अंदाजे किंमत ३५,००० रुपये ,एक ग्रॅम सोन्याच्या दोन नथा अंदाजे किमत १२,००० रुपये ,एक ग्रॅमचे कानातील फुल अंदाजे किंमत ६,००० रुपये,दोन भारचे छडीचे कडे अंदाजे किमत १,४०० रुपये,५०,००० रुपये नगदी असा एकूण १,०४,४०० रुपयांचा एवज लंपास केल्या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात बाबासाहेब राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.पुढील तपास (Georai police)गेवराई पोलीस करत आहेत.