धाराशिव: उमरगा शहरातील बाह्यवळण (Accident)रस्त्याच्या कॉर्नरजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण-भावांचा जागीच मृत्यु झाला. दोघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते.वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अधिक माहितीनुसार,धारिशिव तालुक्यातील कोळसूर (गुंजोटी) (Accident)येथील रहिवाशी शिवाप्पा सातप्पा मगे हे आपली बहिण अनिता देवेंद्र माळी यांना(Mumbai) मुंबई येथे पाठविण्यासाठी बसस्थानकात आले होते. बस नसल्याने दोघेही परत कोळसुर गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. याचवेळी उमरगा शहराच्या बाह्य वळण रस्त्याकडे जात असताना हैद्राबादकडे निघालेल्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. टेम्पोने दोघांनीही फरफटत नेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यु झाला.
बातमी शेअर करा