आष्टी दि.१५ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Ashti) खिळद येथील संत वामनभाऊ मंगल कार्यालयात अज्ञात महिलेने नवरदेवाच्या खोलीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,११,००० रूपयांचा एवज लंपास केल्याची घटना (दि.१४) बुधवार रोजी संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान घडली. (Ashti) या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात चोरीच्या घटनेत(Beed) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.अश्यातच पल्लवी सुखदेव वनवे (वय ३१)रा.सुरुडी ता.आष्टी यांच्या फिर्यादीवरून दि.१४ मे रोजी संत वामनभाऊ मंगल कार्यालय खिळद या ठिकाणी लग्न कार्य होते. नवरदेवाच्या रूममधुन अनोळखी (Ashti)महिलेने सोने, चांदी व रोख रक्कम असे एकूण २ लाख ११ हजार रूपयांचा एवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन(Crime) पुढील तपास क्षीरसागर हे करत आहेत.