दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज (Virat Kohli) विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) आपल्या निर्णयाची माहितीही दिली होती. विराटने आज (दि. १२) साेशल मीडियावर पोस्ट करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले. आपली कसोटी कारकीर्द अधोरेखित करताना त्याने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
विराट कोहली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, (Virat Kohli) भारतीय क्रिकेट कसोटी संघात पदार्पण केल्याला आज १४ वर्ष पूर्ण झाली आहे. खरं सांगायचं तर, कसोटी क्रिकेटचा हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या प्रवासानं मला अनेक वेळा माझी कसोटीला घेतली, मला घडवलं आणि तसेच आयुष्यभर सोबत राहतील असे धडे दिले.
बातमी शेअर करा