Advertisement

बारावीचा निकाल जाहीर

प्रजापत्र | Monday, 05/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC Result २०२५) बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. पुन्हा एकदा ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारलीय. कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका निकाल लागलाय. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा  (HSC Result २०२५) लागला आहे. लातूरमध्ये ८९.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

 

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के असा सर्वाधिक असून लातूर विभागाचा ८९.४६ टक्के असा सर्वात कमी निकाल आहे.  (HSC Result २०२५) तर उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांचा निकाल ८९.५१ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे.

 

नऊ विभागीय मंडळ

पुणे ९१.३२

नागपूर ९०.५२

छत्रपती संभाजीनगर ९२.२४

मुंबई ९२.९३

कोल्हापूर ९३.६४

अमरावती ९१.४३

नाशिक ९१.३१

लातूर ८९.४६

कोकण ९६.७४

Advertisement

Advertisement