Advertisement

 बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे पाचव्या स्थानी

प्रजापत्र | Friday, 29/01/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२९ - सलग दोन वेळेस बीड जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार डॉ. प्रितम मुंडे या विकास कामात टॉप टेन मध्ये पाचव्या स्थानी असल्याचे एका सर्वे मधून पुढे आले आहे.
          डॉ.प्रितम मुंडे यांनी सलग दोन वेळेस संसदेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात विकासकामांसाठी सर्वाधिक निधी बीड जिल्ह्यासाठी मिळाला असून जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळालेली आहे. तर उत्कृष्ट नैतिकतेच्या दृष्टीने ही त्या अव्वल स्थानी असल्याचे सर्वेत नमूद करण्यात आले आहे. 
     दरम्यान आपण निवडून दिलेला खासदार हा आपल्या मतदार संघासाठी काय करतो याची माहिती मतदारांना होणे गरजेचे असल्याने सदरील सर्वे करण्यात येतात. आणि याच सर्वेच्या माध्यमातून डॉ. मुंडे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवल्याचे समोर आल्याने त्यांनी पाचवे स्थान पटकावले असल्याने बीड जिल्ह्यासाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे.

Advertisement

Advertisement