Advertisement

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदवीधर शिक्षकांचे धरणे आंदोलन

प्रजापत्र | Monday, 28/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२८(प्रतिनिधी ): पदवीधर(Beed) शिक्षकांनी बदल्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.२८) सोमवार रोजी धरणे आंदोलन केले आहे. या धरणे आंदोलनामध्ये अनेक पदवीधर शिक्षकांची उपस्थिती होती.

बीड जिल्हा (Beed zilha parishad) परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या ७४ प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन परिपत्रक ३ ऑक्टोंबर २०१६व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ व शालेय शिक्षण व क्रिडा (Beed)विभाग दि.२४ मार्च २०२३ मधील २ टिप (१ क) नुसार सेवा अंतर्गत मान्यता प्राप्त मुक्त विद्यापीठातून बीएससी पदवी प्राप्त केली असल्याने विषय रूपांतर करून गणित विज्ञान विषय संवर्धात प्राथमिक शिक्षक पदवीधर म्हणून समावेश करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस भुमिका घेतली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी विकास गवते, दिलीप सानप, जितेंद्र सांगळे, चव्हाण निलेश, सानप ए.एन, श्री.वाहळ, श्री.कोकाटे, श्री.खाकरे, श्री.घोडके, श्री.आळणे सह आदींचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement