Advertisement

दिल्लीत बॉम्बस्फोट

प्रजापत्र | Friday, 29/01/2021
बातमी शेअर करा

दिल्ली-दिल्लीमध्ये इस्राइलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला आहे. दुतावासाच्या इमारतीपासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण, चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या स्फोटाचा तपास सुरू केला आहे. २९ जानेवारीला हा ब्लॉस्ट झाल्यामुळे चिंता वाढली आहे, कारण भारत-इस्राइलच्या मैत्रीचा हा २९ वा वर्धापन दिवस होता. 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एपीजे अब्दुल कलाम रोडवरील जिंदल हाऊसजवळ एक आईईडी ठेवला होता. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तीन गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. संपूर्ण परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement