बीड दि.२४(प्रतिनिधी): शहरातील (Beed) बस स्थानकातून बसमध्ये चढताना चोरटयांनी गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना (दि.२३) बुधवार रोजी घडली असुन एकूण १,२०,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (shivajinagar police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील बस(Bus) स्थानकातून मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने घडत असून काल शांताराम कुंडलिक वायकर रा.नेवासा जि. आहिल्यानगर (वय ५८) हे शहरातील बस स्थानकातून बसमध्ये बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत (Beed police)अज्ञात चोरटयांनी गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली असून एकूण १,२०,००० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा