Advertisement

मस्साजोगमध्ये फोडले दुकान

प्रजापत्र | Monday, 21/04/2025
बातमी शेअर करा

केज दि.२१ (प्रतिनिधी):तालुक्यातील(Kaij) मस्साजोग येथील अज्ञात चोरटयांनी (दि.१९) शनिवार रोजी रात्री वेल्डींगच्या दुकानाचा(Crime news) दरवाजा तोडून  ५०,५०० हजारांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली असून चोरट्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पांडुरंग बाबुराव आणेराव (वय ३३) रा.येवता ता.केज यांचे मस्साजोग येथे वेल्डींगचे दुकान आहे.अज्ञात चोरटयांनी (दि.१९) शनिवार रोजी रात्री दुकानाचा दरवाजा तोडून कटर मशीन अंदाजे किंमत १२००० रुपये,९० फूट वेल्डींग वायर कॉपरचे अंदाजे किंमत ११००० रुपये,ट्रॉली हुक १५ मग अंदाजे किंमत १०००० रुपये,गीटी नग अंदाजे किंमत ५०००,कॅमेरा टोरेज मशीन अंदाजे किंमत ७००० रुपये, एक कॅमेरा अंदाजे किंमत ५०००,नट बोल्ट खोलण्याचे पाने अंदाजे किंमत ५०० रुपये असा एकूण ५०,५०० हजारांचा मुद्देमाल लंपास केला असून पांडुरंग आणेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.२०) रविवार रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.प्रकरणाचा अधिक तपास पोलीस(Kaij police) करत आहेत.

Advertisement

Advertisement