Advertisement

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीवर कोयत्याने हल्ला

प्रजापत्र | Sunday, 20/04/2025
बातमी शेअर करा

वडवणी दि.२०(प्रतिनिधी): पती हा(Beed) सतत दारु पिऊन येवून पत्नीला दारु पिण्यास पैसे का देत नाही अशी भांडणाची कुरापत काढली. तेव्हा पत्नी म्हणाली कि, मी तुम्हाला कुठून पैसे देणार असं म्हणताच पतीने कोयत्याने पायावर मारुन पत्नीला जखमी केले आहे. (Crime)तालुक्यातील उपळी येथे हि घटना घडली असून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     वडवणी (Wadwani) तालुक्यातील उपळी येथील सुनिता सतीश पवार व सतीश केशव(Crime news) पवार हे दोघे नात्याने पत्नी व पती आहेत. पती सतीश पवार हे दारू पिण्यास पैसे का देत नाही अशी भांडणाची कुरापत काढली तेव्हा पत्नी सुनीता पवार म्हणाल्या की, मी तुम्हाला कुठून पैसे देणार असे म्हणतात पती सतीश पवार यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून पत्नी सुनीता यांना जीवे मारण्याची धमकी दिली व बाजूलाच पडलेल्या कोयत्याने पत्नी सुनीता यांच्या उजव्या पायावर मारून (दि.१४) सोमवार रोजी दुपारी जखमी केले आहे. जखमी झालेल्या सुनीता पवार यांनी उपचार घेतल्या नंतर (दि.१८)शुक्रवार रोजी वडवणी (Wadwani police) पोलीस ठाण्यात पती सतीश केशव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर आरोपी हा फरार आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement