पाटोदा दि.२० (प्रतिनिधी): पाटोद्याहून (Patoda)जामखेडकडे निघालेल्या एका महिला कर्मचार्याच्या पर्समधून ५७ हजार ३०० रुपये काढून घेतल्याची घटना (दि.१९) शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली असून याप्रकरणी अज्ञात महिले विरोधात पाटोदा(Crime) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,लक्ष्मी भीमराव डफळ (वय४५) रा. जामखेड ता. जामखेड या शासकीय(Patoda) कर्मचारी आहेत. सदरील महिला जामखेडला जाण्यासाठी पाटोद्याहून एस.टी. बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ५७ हजार ३०० रुपये काढून आपल्या पर्समध्ये ठेवले होते.(St bus) एस.टी.मध्ये बसल्यानंतर त्यांच्या बाजूलाच अनोळखी महिला बसली होती. या अनोळखी महिलेने डफळ यांच्या पर्समधील पैसे काढून घेतले. हा प्रकार महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर पाटोदा पाोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत .