चकलांबा दि.१९(वार्ताहर):गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.१८) शुक्रवार रोजी सकाळी पाचच्या सुमारास कारवाई करत ४,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक करताना अज्ञात ट्रॅक्टर चालकावर चकलांबा पोलिसांनी (दि.१८) शुक्रवार रोजी सकाळी पाचच्या सुमारास कारवाई केली. यात महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र एमएच २० एबी १६३० अंदाजे किंमत ४,००,००० रुपये व एक लाल रंगाची विना नंबरची दोन चाकी ट्रॉली अंदाजे किंमत ५०,००० रुपये व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ३००० रुपये असा एकूण ४,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर जागीच सोडून चालक मालक पसार झाले. पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत