बीड : राजकारण समाजकारण करताना पद का रक्ताच नातं याचा विचार करावा लागतो. काहींनी माझ्या मनात देखील विष कालवण्याचा प्रयत्न केला होता, मलाही आमदारकीच्या ऑफर आल्या होत्या , पण मी पदासाठी कधी रक्ताच्या नात्याला धोका दिला नाही असे बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीच्या ४ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देताना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राजकारण आणि नातेसंबंध यावर भाष्य केले. 'काकूंनी त्यांच्या शेवटच्या क्षणात आम्हा सर्वांना एकत्र बोलावले होते , सर्वांचे हात हातात घेतले होते आणि आता जयदत्त क्षीरसागर म्हणतील तसे वागा ' असे सांगितले होते. आंम्ही तेच सूत्र पाळत आहोत असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. 'काहींना आमदार होण्याची घाई झाली होती, आमदारकीच्या ऑफर मलाही आल्या होत्या. काहींनी माझ्याही मनात विष कालवायचा प्रयत्न केला होता. किती दिवस नाल्याचं काढता, आम्ही तुम्हाला आमदार करतो, जयदत्त क्षीरसागरांना आपण लोकसभेला पाठवू ' असे मला काहींनी सांगितले होते . ' पण तुम्ही मला फक्त आमदार कराल, जयदत्त क्षीरसागर आमदार झाले तर त्यांना मंत्रिपद द्यावे लागेल, त्यातच आमच्या भागाचा फायदा आहे ' असे मी त्यांना सांगितले. 'माझ्यापेक्षा राजकारणात जुनिअर असलेले अनेक लोक आमदार मंत्री झाले, पण आम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा पदाला महत्व दिले नाही. काकू आणि अण्णा यांच्याच विचाराने चालत आहोत ' असेही डॉ. क्षीरसागर म्हणाले.
बातमी शेअर करा