Advertisement

पाटोद्यात शासकीय गोदाम फोडले

प्रजापत्र | Thursday, 17/04/2025
बातमी शेअर करा

 पाटोदा दि.१७ (प्रतिनिधी): शहरातील(Patoda) ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय धान्य दुकान गोदामाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटयांनी गव्हाचे व तांदळाचे ११ कट्टे लंपास केल्याची घटना (दि.१४) सोमवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाटोदा पोलीस(Patoda police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

           पाटोदा (Patoda) शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय धान्य दुकान गोदामाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटयांनी गव्हाचे ७ व तांदळाचे ४ असे मिळून एकूण ११ कट्टे लंपास केल्याची घटना (दि.१४) सोमवार रोजी घडली असून एकूण ११,००० हजारांचा मुद्देमाल लंपास(Crime) केल्याप्रकरणी सोमनाथ अशोक होळकर (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून (दि.१६) बुधवार रोजी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Advertisement

Advertisement