Advertisement

चोरटयांनी फोडले शिक्षकाचे घर  

प्रजापत्र | Sunday, 13/04/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.१३ (प्रतिनिधी): तालुक्यातील ताकडगाव येथील (Beed)शिक्षक पत्नीस प्रसृतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेवून गेल्यानंतर पाठीमागे घरामध्ये चोरी केली. घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा एकूण ६९ हजार ३३० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना (दि.७) सोमवार (Crime)रोजी घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

   विनोद नामदेव पौळ (वय ४०) रा.ताकडगाव ता.गेवराई जि.बीड हे आपल्या पत्नीस(crime news) प्रसृतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेवून गेले असता अज्ञात चोरट्याने याच संधीचा फायदा उचलून त्यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा एकूण ६९ हजार ३३० रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परत आल्यानंतर पौळ यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात (दि.१२) शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement