पाटोदा दि.७ (प्रतिनिधी): तालुक्यातील(Patoda) डोंगरकिन्ही अंतर्गत असलेल्या रायतेवाडी येथिल तरुण शेतकरी दत्ता संतराम रायते (वय ४४) हे कर्जबाजारी झाल्याने विवंचनेत सापडले.(Beed) याच वैफल्यातुन राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.७)सोमवार रोजी सकाळी (Crime)उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाटोदा तालुक्यातील(Patoda) डोंगरकिन्ही अंतर्गत येत असलेल्या रायतेवाडी येथिल तरुण शेतकरी सध्या चुंभळी शिवारात जळकेवाडी क्षेत्रात आपल्या कुटुंबासह वास्तव्यात होता.शेती व ऊसतोडणी वर उदरनिर्वाह चालवत असे नापिकी व (Beed)कर्जबाजारी झाल्याने तो विवंचनेत होता.मुलांचे कसे होईल याच आशेवर जगत असलेले हा शेतकरी होता.याच वैफल्यातुन त्याने त्याने (दि.७)सोमवार रोजी पहाटे घराच्या दरवाजाला गळफास लावून जिवन संपवले.याघटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस(Patoda police) घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी करण्यासाठी पाटोदा येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
बातमी शेअर करा