Advertisement

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार?

प्रजापत्र | Monday, 17/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१७ (प्रतिनिधी): दोन दिवसापूर्वी(Beed) बीड जिल्ह्यातील आश्रेम शाळेवर नोकरी करणाऱ्या धनंजय नागरगोजे यांना १८ वर्षापासून पगार (Crime)मिळाला नाही. यामुळे नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दरम्यान, या आत्महत्येचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते(Aambadas danve) अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरुन सरकारला सवाल उपस्थित केले. 

 

बीड येथील शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणावरुन संस्थाचालकावर अजूनही(Beed Police) गुन्हा दाखल का झाला नाही?, असा प्रश्न उपस्थित केला. शिक्षक धनंजय नागरगोजे यांचे १८ वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्याने हताश होऊन त्यांनी आत्महत्या केली. बीड शहरातील कृ्ष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. धनंजय नागरगोजे हे मागील १८ वर्षांपासून शाळेवर(School teacher) कार्यरत होते. त्यांनी पगार मागितला. त्यावर तू फाशी घे असे उत्तर विक्रम बाबुराव मुंडेंने दिल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणावर आज विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. तात्काळ संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल होईल, असं उत्तर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. 

 

 

Advertisement

Advertisement