माजलगाव दि.१५ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Majlgaoan)शेलगावथडी शिवारातील बंधाऱ्याजवळ अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच (Majalgaon gramin police)माजलगाव ग्रामीण पोलिसांनी (दि.१४) रोजी कारवाई करत ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हाभरात मागील (Beed)काही दिवसांपासून अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. माजलगाव तालुक्यातील शेलगावथडी शिवारातील बंधाऱ्याजवळ छोट्या टिप्परच्या साहाय्याने गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक करताना गणेश रामा वराट (वय २५) रा.टाकरवन ता.माजलगाव यांच्यावर(Majalgaon gramin police) माजलगाव ग्रामीण पोलिसांनी (दि.१४) रोजी कारवाई केली.यात पिवळ्या रंगाचे अशोक लेलॉन्ड कंपनीचा छोटा टिप्पर क्र. एम एच ३७ टी २०२१ अंदाजे किंमत ७००००० तसेच १ ब्रास वाळू अंदाजे किंमत ६००० रु असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक पोलिसांना पाहताच पसार झाला.अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.