बीड दि.१५ (प्रतिनिधी): कल्याणमध्ये गांजा (Beed crime)तस्काराला सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा बीडचा असून त्यानं बीडहून गांजा कल्याणमध्ये विकायला आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा गांजा कुणाला विकण्यासाठी आणला होता? गांजा तस्कराचं आणि (Beed)बीडचं काही कनेक्शन आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
आरोपीकडून पोलिसांनी १२ किलो ४३६ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. शकील शेख असं गांजा तस्कराचं नाव आहे. शकीलने हा गांजा (Beed)बीडहून आणला होता. शकील बीडचा रहिवासी असून, त्या ठिकाणी तो शेती करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्तांचे पथक कल्याणमध्ये गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलीस हवालदार प्रल्हाद चौधरी यांना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीबंदर परिसरात एक व्यक्ती (kalyan)गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे, पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला.
गांजा विक्रीसाठी आरोपी शकील शेख त्या ठिकाणी पोहोचला. तो संशयितरित्या फिरत असल्याचं (police)पोलिसांना आढळलं. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून १२ किलो ४३६ ग्राम वजनाचा गांजा आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी आरोपी बीडहून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.