बीड दि.१४ (प्रतिनिधी): आ.सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेचं पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून (Satish Bhosale House Fire) दिल्याची घटना काल गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेमध्ये त्याच्या घरातील काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत, या घटनेमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेचं घराचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. त्यानंतर वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोझरने पाडलं होतं. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पाडलेलं घर पेटवण्यात आलं आहे. या आगीत जनावरांचा चारा पेटला काही पशूंचा मृत्यु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. खोक्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. त्यावरून फरार असताना तो कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल. कोणी मदत केली याची माहिती मिळेल. आरोपी शिरूर पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सुरवातीला मेडिकल करण्यात येत आहे. नंतर पोलीस ठाण्यात अटकेची प्रकिया पुर्ण केली जाईल. नंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा